Vruksh Lagvad, आपल्या शेतात व बांधावर वृक्ष लागवडीसाठी मिळणार अनुदान, रोजगार हमी योजना

 


वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. साधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात 20 टक्क्यांच्या आसपास क्षेत्र वनाखाली आहे. वृक्ष लागवड करताना केवळ वन जमिनी, शासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खासगी पड क्षेत्र, शेताचे बांध यावर शेतकऱ्यांनी वन वृक्ष लागवड केल्यास हे उद्दीष्ट सहज साध्य होणार आहे. म्हणून शासनाने सन 2018 पासून  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी स्वत:च्या जमिनीवर वृक्षांची लागवड करु करणार आहेत. यासाठी शासन अनुदान देणार आहे.  

योजनेचा लाभ घेऊ शकणारे लाभार्थी

१. अनुसूचित जाती

२. अनुसूचित जमाती

३.विमुक्त जाती/भटक्या जमाती

४. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

५. स्रीकर्ता असलेली कुटुंबे

६.अल्पभूधारक शेतकरी

७.जमीन सुधारणांचे लाभार्थी

८.आवास योजनेचे लाभार्थी

              योजनेत भाग घेण्यासाठी वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१.विहित नमुन्यातील अर्ज भरून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा. सोबत...

२. लाभार्थी जॉबकार्डधारक असावा.

३.लाभार्थीच्या नावे जमीन असावी, 7/12, 8-अ चा उतारा जोडावा.

४. असल्यास जात प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला जोडावा.

५.मंजुरीनंतर झाडे लागवड करून ती जिवंत ठेवण्याबाबत संमतीपत्र जोडावे.

          या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये नाव नोंदणीकरुन जॉब कार्ड प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा. ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी व काम मंजूर करण्यात येते. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाकडून कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी स्वत: व गावातील इतर मजूर काम पूर्ण करतात. या योजनेतील कामगारांची मजूरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. या योजनेच्या सविस्तर महितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.


Comments

Popular posts from this blog

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

सुकन्या समृद्धी योजना

विश्वकर्मा योजना अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज