नवीन संसद भवन
sankalpadvices.com पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात आलेली ही इमारत पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नव्या संसद भवनाचे डिझाईन वास्तुविशारद बिमल पटेल यांनी बनविले आहे. ते मूळचे गुजरातच्या अहमदाबाद येथील आहेत. नवीन संसद भवनाची इमारत त्रिकोणी आहे. टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड द्वारे चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. लोकसभा खासदारांसाठी ८८८ व राज्यसभा खासदारांसाठी ३२६ पेक्षा जास्त आसन क्षमता असणार आहे. ६४५०० चौ. मी. क्षेत्रफळ आहे. नवीन इमारतीला तीन दरवाजे आहेत. १.ज्ञानद्वार २.शक्तीद्वार ३.कर्मद्वार. खासदार आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची सोय करण्यात आली आहे. नवीन इमारतीचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे संविधान सभागृह. यात संविधानाची प्रत ठेवण्यात येणार आहे. म. गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस तसेच देशाच्या पंतप्रधनांचे फोटोही येथे लावण्यात येतील.