सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती.

केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरजू नगरिकांना आर्थिक मदत किंवा सहाय्य करत असते, या योजना नागरिकांचे सर्वांगीण कल्याण आणि विकास साधण्यासाठी राबविल्या जातात, तसेच या योजनांच्या माध्यमातून गरीब व साधारण जनतेचे जीवनमान उंचावणे त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळेस आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आणि तसेच देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण व त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करणे त्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश या योजनांच्या माध्यमातून शासनाला साध्य करण्याचा असतो. मुलींना उच्च शिक्षण मिळावे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून स्वावलंबीपणे जीवन जगता यावे तसेच मुलींचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या योजनांमध्ये अनेक बचत योजना आहे ज्या नागरिकांना आयकर सूट आणि उच्च व्याजदर प्रदान करतात, जेणेकरून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नागरिकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे.

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा 250/- रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये आहे, नागरिक या योजनेमध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि योग्यतेनुसार गुंतवणूक करू शकतात. हि गुंतवणूक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येते, या योजनेच्या माध्यमातून सरकारव्दारे गुंतवणुकीवर 7.6 टक्के दराने व्याज देण्यात येते. याच्याशिवाय गुंतवणुकीवर या योजनेच्या माध्यमातून आयकरामध्ये सूट सुद्धा देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्वप्रथम मुलींच्या पालकांना पोस्ट ऑफिस मध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँके मध्ये खाते उघडावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

विश्वकर्मा योजना अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज