Posts

Showing posts from July, 2023

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

Image
     राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्प्या-टप्प्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत "जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी" फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये ऐंशी टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेच केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फलबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल व ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य होण्यास मदत होणार आहे.      उपरोक्त पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड

Vruksh Lagvad, आपल्या शेतात व बांधावर वृक्ष लागवडीसाठी मिळणार अनुदान, रोजगार हमी योजना

Image
  वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. साधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात 20 टक्क्यांच्या आसपास क्षेत्र वनाखाली आहे. वृक्ष लागवड करताना केवळ वन जमिनी, शासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खासगी पड क्षेत्र, शेताचे बांध यावर शेतकऱ्यांनी वन वृक्ष लागवड केल्यास हे उद्दीष्ट सहज साध्य होणार आहे. म्हणून शासनाने सन 2018 पासून  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी स्वत:च्या जमिनीवर वृक्षांची लागवड करु करणार आहेत. यासाठी शासन अनुदान देणार आहे.   योजनेचा लाभ घेऊ शकणारे लाभार्थी १. अनुसूचित जाती २. अनुसूचित जमाती ३.विमुक्त जाती/भटक्या जमाती ४. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी ५. स्रीकर्ता असलेली कुटुंबे ६.अल्पभूधारक शेतकरी ७.जमीन सुधारणांचे लाभार्थी ८.आवास योजनेचे लाभार्थी               योजनेत भाग घेण्यासाठी वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. १.विहित नमुन्यातील अर्ज भरून