विश्वकर्मा योजना अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज

 


              देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणासह  आर्थिक हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेद्वारे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाईल. सरकार या योजनेवर ५ वर्षांत १३ हजार कोटी रुपये खर्च करणार असून त्याचा ३० लाख कुटुंबांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

             या योजनेत देशातील 30 लाख कारगीरांना लाभ मिळेल. विश्वकर्मा योजनेत एक लाख रुपयांपर्यंत स्वस्त व्याजदराने कर्जच मिळेलच. पण या कारागीरांना प्रशिक्षण आणि इतर अनेक सोयी-सुविधा मिळतील. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांनी 2023 मधील अर्थसंकल्पात केली होती. 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती दिनी या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.

             16 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत या योजनेला मंजूरी देण्यात आली. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेसाठी केंद्र सरकारने 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

             या योजनेत देशातील कारगारींना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. या कर्जावर 5 टक्के व्याजदर द्यावे लागेल. पहिल्या टप्प्यात या योजनेत कारागीरांना एक लाखांचे कर्ज उपलब्ध होईल. तर दुसऱ्या टप्प्यात एक लाखांचे अतिरिक्त कर्ज मिळू शकते. पण एकावेळी केवळ एक लाख रुपयांचे कर्ज मिळेल. या सर्वांच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्याचा हा प्रयत्न आहे.

             या योजनेत केंद्र सरकार एक लाख रुपयांचे स्वस्त कर्ज देईल. तर दुसरीकडे केंद्र सरकार कारागीरांना त्यांच्या व्यवसायात आणखी निपुण करण्यासाठी तसेच जागतिक कसोट्यांवर उतरण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये तात्पुरते आणि विशेष प्रशिक्षणाचा समावेश आहे. त्यांना 500 रुपयांचा प्रशिक्षण भत्ता पण देण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

सुकन्या समृद्धी योजना