PM Kisan Yojana शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार
पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील निर्णय घेण्यात आला आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात बारा हजार रुपये जमा होणार आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळायचे आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून, शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळणार आहेत.
नवीन आलेल्या GR नुसार या योजनेसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले असेल व पी एम किसान पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेले असेल ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळतात त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत. जर पीएम किसन पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पी एम किसान योजनेच्या PMFS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरण वेळी पात्र ठरलेल लाभार्थी नमो शेतकरी सन्माननिधी योजनेत पात्र ठरेल व लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टल/प्रणाली वरून बँक खात्यामध्ये थेट निधी जमा केला जाईल.
Comments
Post a Comment