दहावीचा निकाल जाहीर

             


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यभरातून सुमारे 15.77 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. एकूण 533 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 93.84 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:

कोकण विभाग 98.11 टक्के

कोल्हापूर विभाग 96.73 टक्के

पुणे विभाग 95.64 टक्के

मुंबई विभाग 93.66 टक्के

छत्रपती संभाजीनगर विभाग 93.23 टक्के

अमरावती विभाग 93.22 टक्के

लातूर विभाग 92.67 टक्के

नाशिक विभाग 92.22 टक्के

नागपूर विभाग 92.05 टक्के

  नेहमीप्रमाणेच यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 95.87 टक्के तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 92.05 टक्के आहे.Comments

Popular posts from this blog

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

विश्वकर्मा योजना अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना