सर्वांना मिळणार 5 लाखाचा विमा, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे एकत्रीकरण
राज्यात यापूर्वी केसरी व अंतोदय शिधापत्रिका धारकांनाच मिळणारा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ यापुढे सर्व नागरिकांना मिळणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसोबत या योजनेच्या एकत्रित अंमलबाजवणीमुळे लाभार्थी दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट असलेले उपचार घेऊ शकणार आहे.
राज्यातल्या सर्व जनतेला आता 5 लाखांचा विमा दिला जाणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारने राज्यातल्या साडे बारा कोटी जनतेला 5 लाखांचा आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना 5 लाखांचा विमा लाभ घेता येईल. सुरवातीला योजनेची 2 कोटी कार्ड वाटली जातील. 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सरकार सुरू करणार आहे. यासाठी 210 कोटींच्या निधीची मान्यता देण्यात आली आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात ही योजना सर्वांसाठी असेल. लाल, पिवळे, केसरी सर्व रेशनकार्डसाठी ही योजना लागू असेल.
Comments
Post a Comment