वाटचाल - नोटबंदी व दोन हजार रुपयांची नोट
2000 रुपयांची नोट 8 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या 500 व 1000 च्या नोटबंदी नंतर चलनात आली. 8 सप्टेंबर 2016 रोजी रात्री ठीक 8:00 वाजता आपल्या देशाचे तक्तालिन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले, की आज रात्री 12:00 वाजेपासून 500 व 1000 च्या नोटा चलनातून बंद करण्यात येत आहेत. तेव्हा जवळ जवळ 85% नोटा चलनानुत बाद झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले होते.
500 व 1000 च्या नोटांवर बंदी आल्यानंतर, त्याबदल्यात नवीन 500 व 2000 च्या नोटा बँकेत उपलब्ध करण्यात आल्या. मात्र नोटा बदलून घेण्याची मर्यादा फक्त 4000 रुपये होती व तीही काही ठराविक कालावधीसाठी. नोटबंदी च्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. ग्रामीण भागातील गोरगरीब रोख पैशांवर अवलंबून सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.
बेहोशोबी संपत्तीवर टाच आणणे व काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी केल्याचे कारण तेव्हा देण्यात आले होते. तसेच कॅशलेस व्यवहाराला चालना मिळण्यासाठीही नोटबंदी उपयुक्त ठरू शकते असे बोलले जात होते. बनावट नोटा चलनातून बाद होण्यासाठी नोटबंदी गरजेची आहे आहे असेही अभ्यासकांचे मत होते.
7-8 वर्षानंतर 19 मे 2023 रोजी शासनाने पुन्हा नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिसर्व्ह बँकेने अचानक 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिसर्व्ह बँकेने याविषयीचे पत्र जारी करून हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे नागरिकांची धकधक वाढली आहे. परंतु ही नोटबंदी 2016 पेक्षा सौम्य असल्याचे दिसत आहे. काही राजकीय नेत्यांनी रिसर्व्ह बँक तसेच सरकारवर टीका केली आहे.
क्लीन नोट पॉलिसी नुसार 2000 च्या नोटा बंद केल्याचे रिसर्व्ह बँकेने म्हटले आहे. येत्या 23 पासून बँकेत 2000 च्या नोटा बदलण्याची प्रकिया सुरू होईल. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत बदलवून मिळतील. मात्र एका वेळेस फक्त वीस हजार पर्यंत नोटा बदलवून मिळतील. तसेच नागरिक आपल्या बँक खात्यातही नोटा जमा करू शकतात.
Comments
Post a Comment