Posts

नवीन संसद भवन

Image
sankalpadvices.com  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात आलेली ही इमारत पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नव्या संसद भवनाचे डिझाईन वास्तुविशारद बिमल पटेल यांनी बनविले आहे. ते मूळचे गुजरातच्या अहमदाबाद येथील आहेत.  नवीन संसद भवनाची इमारत त्रिकोणी आहे. टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड द्वारे चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. लोकसभा खासदारांसाठी ८८८ व राज्यसभा खासदारांसाठी ३२६ पेक्षा जास्त आसन क्षमता असणार आहे.  ६४५०० चौ. मी. क्षेत्रफळ आहे. नवीन इमारतीला तीन दरवाजे आहेत. १.ज्ञानद्वार २.शक्तीद्वार ३.कर्मद्वार. खासदार आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची सोय करण्यात आली आहे. नवीन इमारतीचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे संविधान सभागृह. यात संविधानाची प्रत ठेवण्यात येणार आहे. म. गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस तसेच देशाच्या पंतप्रधनांचे फोटोही येथे लावण्यात येतील. 

थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आज स्मृतिदिन

Image
थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आज स्मृतिदिन...  लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1901 रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर याठिकाणी झाला. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. 1923 साली कोलकात्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून 'तर्कतीर्थ' ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांचा स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला. प्राज्ञ पाठशाळेचे वातावरण सनातनी पढिक पांडित्याचे नव्हते. ते पुरोगामी चिकित्सेचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते. परिणामतः राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनांत भाग घेण्याची प्रेरणा या वातावरणातून शास्त्रीजींना लाभली. महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदुधर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार करून दिले. 1930 व 1932 मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना प्

महाज्योती - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा

Image
    क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ अन्वये (कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ नुसार) केली आहे. या अंतर्गत लक्षीत प्रवर्गासाठी उद्देशीत कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत. • इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), आणि विशेष मागास वर्ग (SBC) तसेच शासन किंवा महाज्योतीने निश्चित केलेल्या वंचित व उपेक्षित जनसमुहांशी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे आणि शासनास त्यावरील उपाययोजना सुचविणे. • प्रमुख संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणून काम करणे व लक्ष्य गटांसाठी समाजिक शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे. • कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार,

वाटचाल - नोटबंदी व दोन हजार रुपयांची नोट

            2000 रुपयांची नोट 8 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या 500 व 1000 च्या नोटबंदी नंतर चलनात आली. 8 सप्टेंबर 2016 रोजी रात्री ठीक 8:00 वाजता आपल्या देशाचे तक्तालिन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले, की आज रात्री 12:00 वाजेपासून 500 व 1000 च्या नोटा चलनातून बंद करण्यात येत आहेत. तेव्हा जवळ जवळ 85% नोटा चलनानुत बाद झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले होते.  500 व 1000 च्या नोटांवर बंदी आल्यानंतर, त्याबदल्यात नवीन 500 व 2000 च्या नोटा बँकेत उपलब्ध करण्यात आल्या. मात्र नोटा बदलून घेण्याची मर्यादा फक्त 4000 रुपये होती व तीही काही ठराविक कालावधीसाठी. नोटबंदी च्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. ग्रामीण भागातील गोरगरीब रोख पैशांवर अवलंबून सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. बेहोशोबी संपत्तीवर टाच आणणे व काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी केल्याचे कारण तेव्हा देण्यात आले होते. तसेच कॅशलेस व्यवहाराला चालना मिळण्यासाठीही नोटबंदी उपयुक्त ठरू शकते असे बोलले जात होते. बनावट नोटा चलनातून बाद होण्यासाठी नोटबंदी गरजेची आहे

उष्माघात _ उन्हामुळे मृत्यू का होतो ?

  उष्माघात उन्हामुळे मृत्यू का होतो ? आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यकआहे . पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. - जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात. रक्तातलं पाणी कमी झाल्या मुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्

बालसंगोपन योजनेत एकल पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये

 बालसंगोपन योजनेत एकल पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये बालसंगोपन योजनेत १ एप्रिल २०२३ पासून मुलांना २२५० रुपये मिळणार  आहेत. बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते.या योजनेत कालपर्यंत ११०० रुपये मिळत होते .ते आज एक एप्रिल पासून  २२५० रू मिळणार आहेत. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.  ही योजना कोणाला मिळते..? एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले  आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा HIV बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना ही योजना मिळते.  वयाची अट काय आहे ? अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानाही प्रत्येकी २२५०रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.   यासाठी उत्पन्न अट किती आहे ? पालकाचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे   घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांना हा लाभ मिळतो का ?   होय,कारण त्या एकल महिला असल्याने नक्की लाभ मिळतो